जीवशील भाव – संत सोपानदेव अभंग

जीवशील भाव । आपणचि देव ।
केला अनुभव । गुरुमुखें ॥१॥
मी तूं पणा मन । ठेविवेले पूर्णी ।
वासना हे जनी । ब्रह्म जाली ॥२॥
सोपान हा ब्रम्ह । वर्ततसे सम ।
प्रपंचाचे काम । नाही येथे ॥३॥