हरिविण नाही वेदांदिका मती – संत सोपानदेव अभंग
हरिविण नाही वेदांदिका मती ।
श्रुती त्या संपत्ती जया रूपी ॥१॥
हरी हाची सर्व उपनिषद भाव ।
रोहिणीची माव जनी दिसे ।।२।।
सर्वघटी राम जीवशिव सम ।
सर्वरूपे ब्रह्म भरले सदा ॥३॥
सोपान निकट परब्रह्म सेवी ।
सर्व हा गोसावी विड्ठलराज ।।४।।