हरिसुखवेषे नाचतो सर्वदा – संत सोपानदेव अभंग
हरिसुखवेषे नाचतो सर्वदा ।
गोविंद परमानंदा हरिबोधे ॥१॥
रामकृष्ण नामी या नामी आनंदु ।
नित्पनित्य गोविंद आम्हाधरी ॥२॥
निगुण नेणे सगुणाचार ।
सगुण विचार सर्वकाळ ॥३॥
सोपान पावप अवघेचि हरिरुप ।
हरिविण स्वरुप ने चित्ती॥४॥