हरि असे देही सर्वकाळ संपन्न – संत सोपानदेव अभंग
हरि असे देही सर्वकाळ संपन्न ।
म्हणोनि चिंतन निरंतर ॥१॥
हरिविण नाही हरविण नाही ।
दिशा द्रुम पाही विंबलासे ।॥२॥॥
हरिविण देवो नाही अन्य भावो ।
हरि असे सर्व देहभावी ।।३।॥
सोपान सांगत हरि सर्वत्र वसे ।
भाग्यवंता दिसे सर्व काळ ॥४॥