हरि असे देही हाचि भावो खरा – संत सोपानदेव अभंग

हरि असे देही हाचि भावो खरा ।
वाया तू सैरा धावू नको ॥१॥
धावता अवचटे पडसील व्यसनी ।
संसारपसणी योनिमाळे ॥२॥
हरिचेनि ध्यान निरंतर करी ।
बाह्य अभ्यंतरी एकु राम ॥३॥
सोपान म्हणे राम नादे सर्वा घटी ।
विधी जगजेठी क्षरलासे ॥४।।