गोविंद मायव हा जपु आमुचा – संत सोपानदेव अभंग
गोविंद मायव हा जपु आमुचा ।
नाही प्रपंचाचा आम्हा लेशु ॥१॥
गोविंद स्मरणे नित्यता पारणे ।
हरिनाम पटणे मोभमुक्ति ।। २।॥
नलगती तीर्थे एक गोविंद पुरे ।
वेगी कृष्ण धुरे बोलगो सदा ॥३॥
सोपान सांगत गोविंद स्मरणे ।
नित्यता ध्याने गोविंद ऐसे॥४॥