गोपाळ अच्युत हा नाममहिमा – संत सोपानदेव अभंग
गोपाळ अच्युत हा नाममहिमा ।
नित्यता पूर्णिमा आम्हा देही ॥१॥
रामकृष्ण नाम हा जप परम ।
ऐसा नित्य नेम सारू रया ॥२॥
वासना वोढाळ नेषो पै बरळ ।
नित्यता अढळ गोपाळ सेवू ॥३।।
सोपान सार जपतुसे नाम ।
दिननिशी नेम हृदयात ॥४॥