घोंगडीयासाठी – संत सोपानदेव अभंग
घोंगडीयासाठी । पंढरीये पेठीं ।
वैष्णवाची दाटी । होती तेथें ॥१॥
घोंगड्यांचे मोल । पैं खरें होई ।
रामटका देई । एक पुरे ॥२॥
घोंगडी घोंगडिया । पाड दाविताती ।
एक एक दाविती । एकपुढे ॥३॥
सोपान घोंगडी । पाहे घडी केली ।
चरणी राहिली । निवृत्तीच्या ॥४॥