दुजेपणी ठाव द्वैत हे फेडिले – संत सोपानदेव अभंग
दुजेपणी ठाव द्वैत हे फेडिले ।
अद्वैत बिंबले तेजोमय ।। १ ॥
तेजाकार दिशा बिंबी बिंब एक ।
निवृत्तीने चोख दाखविले ॥२॥
निमाली वासना बुडाली भावना ।
गेली ते कल्पना ठाव नाही ॥३॥
सोपान नैश्वर परब्रह्म साचार ।
सेवितु अपार नाम घोटे ॥४॥