आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे – संत सोपानदेव अभंग
आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे ।
नाममार्गे वळगे निषे रया ।।१।।
नाम परब्रह्म नाम परब्रह्म ।
नित्य रामनाम जपीतुसे ॥२॥
अंतरीच्या सुखे बाहिरिलिया ।
वैखे पर्रह्म सुखे जपतुसे ॥३॥
सोपान निवांत रामनाम मुखात ।
नेणे दुजी मात हरिविण ।।४।।