आत्मरुप सुख आत्मपणे चोख – संत सोपानदेव अभंग

आत्मरुप सुख आत्मपणे चोख ।
निर्गुणीचे चोख सगुणी जाले ।।१।।
रुप अरुप रूयामाजी सर्व ।
रूपी भावाभाव नाटवती ।॥२।।
बुडाले सगुण नाही मी तू पण ।
अंतराची खूण मावळली ॥३॥
सोपान गुरू ते ते ब्रह्म पुरते ।
पुसोनी आरूते ठाकियेले ॥४॥