आपरुप हरी आपणची देव – संत सोपानदेव अभंग
आपरुप हरी आपणची देव ।
आपणची भाव सर्व जाला ।।१।।
सर्व हरी हरी ब्रह्म अभ्यंतरी ।
एक चराचरी आत्माराम ।।२।।
सर्व काळ सम नाही तेहो विषम ।
आयणची राम सर्व ज्योती ।।३।।
सोपान तिष्ठत रामनामी लीन ।
मन तेथे मौन्य एकपणे ॥४॥