आम्ही नेणो माया नेणो ते – संत सोपानदेव अभंग
आम्ही नेणो माया नेणो ते काया ।
ब्रह्म लवलाह्या आम्हामाजी ।।१।।
मी तू गेले ब्रह्मी मन गेले पूर्णी ।
वासना ते जनी ब्रह्म जाली ॥२॥
जीवशिवभाव आपणची देव ।
केला अनुभव गुरूमुखे ।।३॥
सोपान ब्रह्म वर्ततसे सम ।
प्रपंचाचा अम नाही नाही ॥४॥