श्री संत शिरोमणी सावता महाराजांची आरती
जय संता जय भक्ता । जय सावत्या श्रेष्ठा ।
अगाध ज्ञान तुझे । थोर प्रतापी वरिष्ठा ॥१॥ धृ.॥
माळियाचे वंशी । घेऊनिया अवतार ।
सकळिकांचा पूर्णपणे केला त्वा उध्दार ॥२॥ जय संता जय
संपूर्ण भक्तज्ञान । सकल वेद सार ।
देव त्वा साठविला । चिरूनिया उदर ॥३॥ जय संता जय
देवे तुज गौरविले । जन्मोजन्मी साह्य केले ।
दुर्जने तुज जासिले । ते दैव फजित झाले ॥४॥ जय संता जय
वश्वरूप बोध ठेवा । काशिबाशी दिधला ।
सकल संता भक्तभाव । गृहस्था श्रमी दाविला ॥५॥ जय संता जय संता ॥
पूर्ण ज्ञानी जीवन्मुक्त । भक्तिज्ञान विसावा ।
आरणी दाखाविला । पुर्ण पाविञ ठेवा ॥६॥ जय संता जय
भिकू शरण आला तुज । पुर्ण अनन्य भावा ।
जागृत महिमा दावोनी । व्यक्त केला नीज ठेवा ॥७॥ जय संता जय