समयासी सादर व्हावे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ८

समयासी सादर व्हावे । देवे ठेविले तैसे राहावे ।।

कोणे दिवशी बसून हत्तीवर । कोणे दिवशी पालखी सुभेदार ॥

कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे । कोणे दिवशी बसून याची मन ।।

कोणे दिवशी घरात नाही धान्य । कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे ॥

कोणे दिवशी यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ॥

कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे । कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा ।।

कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा । कोण्या दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे ॥