नको तुझे ज्ञान नको तुझा मान – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ६

नको तुझे ज्ञान नको तुझा मान । माझे आहे मन वेगळेचि ॥

नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती । मज आहे विश्रांती वेगळीच ॥

चरणी ठेउनी माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापना ।।