नामाचिया बळे न भिऊ सर्वथा – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ५

नामाचिया बळे न भिऊ सर्वथा । कळीकाळाचे माथा सोटे मारू ।।

वैकुंठाचा देव आणूया कीर्तनी ॥ विठ्ठल गाउनी नाचू रंगी ।।

सुखाचा सोहळा करूनि दिवाळी । प्रेमे वनमाळी चित्ती धरू ॥।

सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा । तेणे मुक्ती द्वारा वोळंगती ॥