ऐकावे हे विठ्ठल धुरे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ४

ऐकावे हे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरे ।।

करी संसाराची बोहरी ।इतुके मागतो श्रीहरी ।।

कष्ट करिता जन्म गेला । तुझा विसर पडला ।।

माळी सावता मागतो संतान । देवा करीगा नि:संतान ।।