मागणे ते आम्हा नाही हो कोणासी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३७

मागणे ते आम्हा नाही हो कोणासी । आठवावे संतासी हेचि खरे॥

पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशीच ॥

सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥