आमुची माळियाची जात – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३६
आमुची माळियाची जात । शेत लावू बागाईत ॥
आम्हा हाती मोट नाडा । पाणी जाते फुल झाडा ॥
शांती- शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥
सावताने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळा॥
स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातोहात ॥