भली केली हीन याति – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३४

भली केली हीन याति। नाही वाढली महंती ॥१॥

जरी असता ब्राम्हण जन्म ।तरी हे अंगी लागते कर्म ॥२॥

स्नान नाही, संध्या नाही । याति कुळ संबंध नाही ॥३॥

सावता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपती ॥४॥