विकासले नयन स्फुरण आले बाही – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३३
विकासले नयन स्फुरण आले बाही । दाटले ह्रदयी करुणा भरित ॥
जाता मार्गी भक्त सावता तो माळी । आला तयाजळी पांडुरंग ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भितर गेला देव ॥
तब तो समाधीस्थ झाकुनी नयन। वाचे रामकृष्ण जपे सदा ॥
माथा ठेऊनिया हात केला सावधान। दिले आलिंगन चहुभुजी ॥
चरणी ठेवोनी माथा, विनवितो सावता। बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥