पैल पहा हो परब्रह्म भुलले – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३१

पैल पहा हो परब्रह्म भुलले | जगदीश काहो परतंत्र झाले ||

काय सुख केले येणे नेणिजे | कोण भाग्य गौळियाचे वर्णिजे ||

आदि अंतु नाही जया व्यापका | तो माये उखळी बांधिला देखा ||

सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसला हे श्रीमुखकमळ ||

योगिया ह्रदय कमळीचे हे निधान | दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ||

सावता स्वामी परब्रह्म पुतळा | तनु मनाची कुरवंडी ओवाळा ||