अकाराच्या माथा नकार बैसला – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३०

अकाराच्या माथा नकार बैसला । लकार भारला मिथ्या पाही ।।

ऐसा तो उमज नाही या मानवा । उगाच वणवा लागे देही ।।

विषयी गुंतला नाही केले ध्यान । पातकी दुर्जन अविचारी ॥

सावता म्हणे भजन करावे देवाचे । योग-याग तयाचे कष्ट बहू