विश्रांति सुखासि सुख पैं जाहलें – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २९

विश्रांति सुखासि सुख पैं जाहलें । ते उभे असे ठेलें विटेवरी ॥

डोळियांचे धनी पाहतां न पुरे । गौळी ते साजिरे खेळविती ॥

आगमा न कळे, निगमा वेगळे । गोकुळी लोणावळे चोरितसे ।।

सावता म्हणे ज्याचा न कळेचि पार । तो हरी साचार चारी गाई ।।