नेणो योग-याग तपे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २४

नेणो योग-याग तपे । वाचे जपे विठ्ठल ।।

हेची आमुचे निजधन । सुखसंपन्न विठ्ठल ।।

नलगे संपत्ती मान-धन । आम्हा परिपूर्ण विठ्ठल ।।

सावता माळी म्हणे देवा । मज निरवा संतापायी ।।