प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २३

प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी । वासनेची बेडी पडली पाया ।।

सोडवण करा आलोनि संसारा । शरण जा उदारा देवराया ।

प्रबळ मोहपाश विषयासी गोवी । अखंड भोगवी क्लेश नाना ।॥

सावता म्हणे तुम्ही विचारावे मनी । सोयरा निर्वाणी हरी एक ।।