शिव, ब्रह्मा, विष्णू तिन्ही देव एक – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २१
शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥
अद्वैत वासना संतांचि संगती। रायांची उपाधी बोलू नये ॥३॥
हरि मुकुंद मुरारी…. । हा मंत्र उच्चारि, सावता म्हणे ॥४॥