पूर्वापार कुळी पंढरीचा नेम – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २०

पूर्वापार कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठ्ठलाचे॥

तारी अथवा मारी, देवा तुचि एक। न घ्यावी भाक पांडुरंगा।।

वडिलांचा सेवा-धर्म अजुनि चालवी। व्यर्थ न भुलवी मायापाश ॥

सावता म्हणे देवा, अखंड घ्यावी सेवा। आठव असू द्यावा, माझा बाप।।