जगी तारक एक नाम – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १६

जगी तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ।

चला जाऊ तया गावा । पाहू देवा विठ्ठला ।।

वंदू संत चरण -रज । तेणे काज आमुचे ।।

सावता म्हणे विटेवरी । उभा सम चरणी हरी ।।