विवाद करिता भागली दरूशने – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १५
विवाद करिता भागली दरूशने । तोचि आले केणे भीमा-तीरी ।।
पुंडलिक-पेठे रहिवासु केला । शब्द हा मिरविला विठ्ठलनामे ॥
आषाढी-कार्तिकी दोन्हीच पै हाट । वैष्णव बोभाट करिताती ।।
सावता म्हणे तया घालू लोटांगण । हरले भाग शीण जन्मोजन्मी ।