साधनांची आटाआटी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १३

साधनांची आटाआटी। कासया पाठी लाविता।।

एक तुमचे नामाचि पुरे। हेचि धुरे साधन॥

भाळी भोळी करीन सेवा। माना देवा तुम्ही धन्य॥

सावता म्हणे रुक्मिणीवरा। अहो अवधारा वचन माझे ।।