प्रपंची असुनी परमार्थ साधावा – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १०
प्रपंची असुनी परमार्थ साधावा । वाचे आठवावा पांडुरंग ।।
उंच नीच काही न पाहे सर्वथा । पुराणीच्या कथा पुराणीच ॥
घटका आणि पळ साधी उतावीळ । वाउगा तो काळ जाऊ नेदी ।।
सावता म्हणे कांते जपे नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ।।