कांदा मुळा भाजी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १

कांदा, मुळा, भाजी।अवघी विठाबाई माझी ।॥

लसूण, मिरची, कोथिंबीरी । अवघा झाला माझा हरी ।।

ऊस गाजर रताळू, अवघा झालासे गोपाळू।।

मोट, नाडा, विहीर, दोरी |अवधी व्यापली पंढरी ।।

सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा ।।