जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता ।
काय तुज आता सांगू वर्म ।।
किँचित तो अर्थ जरी भरे मना।
मग त्याच्या ज्ञाना पार काय ।।
यमाच्या घरची जाचनी चुकली।
मूळ भेदी खोली उंच पहा ।।
संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।

संत संताजीचे अभंग