दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे ।
एक उभा राऊळा आंगणीँ ।।
एक घाना बैसे जाऊनि ।
एक जपे जप माळ,एक वाजवितो टाळ ।।
एका आंगा लाविले गंध ।
एका अंगा येई सुगंध ।।
एक वाजवितो विणा ।
एक दाखवितो खुणा ।।
एक म्हणतो अभंग ।
एक म्हणे पांडुरंग ।।
संतु म्हणे एक जीँव ।
दोहोँ कुडी दिला ठाव ।।