संसराकरितां जन्म वायां गेला ।
काळ न्याया आला आवचित् ।।
सोडी सोडी यमा मज क्षणभरी ।
घरातील ठेवा दाखवूं दे।।
संतु म्हणे यम कसा तो सोडील ।
नाडील आवघ्यासीँ सावध व्हारे।।