तुझिया सांगातीँ येते कांही कांही ।
कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।
सोयरा न येतोँ बंधू ही येईना ।।
येईना रांडा पोरेँ अंतकाळी ।।
संतु तेली म्हणे उरलिया वेळीँ ।
आठवा वनमाळी रात्रंदिन।।