जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ ।
आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।।
फसविलेँ आणिक कैकेयी मातेशी ।
मंथरा दासीसी त्याच वेळीँ ।।
संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस ।
सदगुरुची कास धरा वेँगीँ ।।