माझिया जातीचा मज भेटो कोणी ।
आवडिची धनी पुरवावया ।। १ ।।
माझिया जातीचा मजशी मिळेल ।
कळेल तो सर्व समाचार ।। २ ।।
संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे ।
येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।।