योगियांचे धन तें ब्रह्म – संत निवृत्तीनाथ अभंग
योगियांचे धन तें ब्रह्म संपन्न ।
तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥
हरिरूप माये सर्वाघटीं आहे ।
दूध लोणी खाये गौळियांचे ॥२॥
चिंति अजामेळा नाम आलें मुखा ।
तो वैकुंठीच्या सुखा देत हरी ॥३॥
निवृत्तिचें धन जगाचें जीवन ।
नाम नारायण तरुणोपाव ॥४॥
योगियांचे धन तें ब्रह्म – संत निवृत्तीनाथ अभंग