विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं – संत निवृत्तीनाथ अभंग
विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं ।
तिष्ठती कामारी मुक्तिचारी ॥ १ ॥
मुनिजनां सुख निरंतर लक्ष ।
भक्तां निजसुख देत असे ॥ २ ॥
पुंडलिकपुण्य मेदिनीकारुण्य ।
उद्धरिले जन अनंत कोटी ॥ ३ ॥
निरानिरंतर भीमरथी तीर ।
ब्रह्म हें साकार इटे नीट ॥ ४ ॥
नित्यता भजन जनीं जनार्दन ।
ब्रह्मादिक खुण पावताती ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर हरीरूप सर्व ।
नाम घेतां तृप्त आत्माराम ॥ ६ ॥
विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं – संत निवृत्तीनाथ अभंग