विस्तार विश्वाचा विवेकें पैं – संत निवृत्तीनाथ अभंग

विस्तार विश्वाचा विवेकें पैं साचा ।
बोलताचि वाचा हारपती ॥ १ ॥
तें रूप श्रीधर कृष्णाचा आकार ।
सर्व निराकार एकरूपें ॥ २ ॥
नसतेनि जीव असतेनि शिव ।
तदाकार माव मावळली ॥ ३ ॥
निवृत्ति स्वरूप कृष्णरूप आप ।
विश्वीं विश्वदीप आपेंआप ॥ ४ ॥

विस्तार विश्वाचा विवेकें पैं – संत निवृत्तीनाथ अभंग