विश्वाचा चाळक सूत्रधारी एक – संत निवृत्तीनाथ अभंग


विश्वाचा चाळक सूत्रधारी एक ।
विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥१॥
तें रूप साजिंरे कृष्ण घनः श्याम ।
योगियां परम रूप ज्याचे ॥२॥
शिव शिवोत्तम नाम आत्माराम ।
जनवनसम गोपवेषें ॥३॥
निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक ।
आपरूपें एक सर्वत्र असे ॥४॥


विश्वाचा चाळक सूत्रधारी एक – संत निवृत्तीनाथ अभंग