विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम – संत निवृत्तीनाथ अभंग
विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम ।
जप हा परम आत्मलिंगीं ॥ १ ॥
निवृत्ति घन दाट कृष्णरूपें आम्हा ।
अखंड पूर्णिमा नंदाघरीं ॥ २ ॥
निवृत्तिचित्ताची गेली लगबग ।
केला अनुराग कृष्णरूपीं ॥ ३ ॥
निवृत्ति धारणा कृष्णनाम सार ।
सर्वत्र आचार हरिहरि ॥ ४ ॥
विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम – संत निवृत्तीनाथ अभंग