विश्रामधर्मता आश्रमपूर्णता – संत निवृत्तीनाथ अभंग


विश्रामधर्मता आश्रमपूर्णता ।
आपरूप कथा निमे जेथें ॥ १ ॥
तें हें कृष्णबाळ गोपिकांसि खेळे ।
नंदाघरीं सोहळें आनंदाचे ॥ २ ॥
कथा त्या कथितां पूर्ण त्या मथिता ।
अरूप अच्युता सर्व असे ॥ ३ ॥
निवृत्ति समाधान कृष्ण हें चोखडें ।
मनोनिग्रह खोड चरणीं गोवी ॥ ४ ॥


विश्रामधर्मता आश्रमपूर्णता – संत निवृत्तीनाथ अभंग