विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी – संत निवृत्तीनाथ अभंग
विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी ।
नामाची पर्वणी भक्तांलागी ॥ १ ॥
तें रूप संपूर्ण वसुदेवाकुळीं ।
यादव गोपाळीं वोळलासे ॥ २ ॥
व्यापकपण धीर ब्रह्मांड साकार ।
तें रूप तदाकार भाग्ययोगें ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट आपण वैकुंठ ।
कृष्णनामें पेठ गोकुळीं रया ॥ ४ ॥
विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी – संत निवृत्तीनाथ अभंग