विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें वंद्य – संत निवृत्तीनाथ अभंग

विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें वंद्य ।
आणि हा अभेद भेद नाहीं ॥१॥
तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें ।
यशोदे निर्धारे प्रेमसुख ॥२॥
हारपती दिशा सृष्टीचा कडवसा ।
आपरूपें कैसा वोळलासे ॥३॥
निवृत्तिसाधन वसुदेवखूण ।
गोपिकाचें धन हरी माझा ॥४॥

विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें वंद्य – संत निवृत्तीनाथ अभंग