वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला – संत निवृत्तीनाथ अभंग
वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला ।
विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ १ ॥
हरिनामा विनट हरि उच्चारीत ।
सप्रेम डुल्लत भक्तजन ॥ २ ॥
चालिला सोपान ज्ञानदेव निधी ।
मुक्ताई गोविंदीं तल्लीनता ॥ ३ ॥
निवृत्ति खेचर परसा भागवत ।
आनंदे डुल्लत सनकादीक ॥ ४ ॥
वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला – संत निवृत्तीनाथ अभंग