वैकुंठदेवत देवामुगुटमणी – संत निवृत्तीनाथ अभंग


वैकुंठदेवत देवामुगुटमणी ।
ऐकीजे पुराणीं कीर्ति ज्याची ॥१॥
तो हरी बाळक गोपिका कौतुक ।
गोपाळ सकळिक संवगडे ॥२॥
आदि शिवाजप जपतु अमुप ।
तें प्रत्यक्ष स्वरूप नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति समाधि उगवली सकळिकां ।
तारि तिन्ही लोकां एक्यानामें ॥४॥


वैकुंठदेवत देवामुगुटमणी – संत निवृत्तीनाथ अभंग